न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. जुलै. २०२०) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष जयंती महोत्सव समितीच्या पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षपदी किशोर लोंढे याची निवड करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
चिखली गावातील दलित समाजातील नागरिकांना मदत करणारा तरूण कार्यकर्ता म्हणुन लोंढे यांची ओळख आहे. किशोर लोंढे हे आमदार महेशदादा लांडगे युवा मंचाचे पदाधिकारी आहेत. स्वी नगरसेवक दिनेश यादव यांचे विश्वासु सहकारी म्हणुन ते परिचित आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याला शहरात काम करण्याची संधी मिळाल्याने आंनद व्यक्त केला जात आहे.


















