न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जुलै. २०२०) :- भाजपाचे राज्यसभेतील सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करू नये, असे खासदारांना सुनावले. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा पुणे शहर शिवसेनेच्या वतीने खरपूस समाचार घेण्यात आला.
शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यासाठी आज गुरुवार दि२३ जुलै रोजी दुपारी २. ३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून निषेध आंदोलन करण्यात आले.















