न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २३ जुलै) रोजी ६७७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज पिंपरी चिंचवड हद्दीतील २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात थेरगाव (स्त्री ५१ वर्षे), मोशी (स्त्री ५५ वर्षे), चिखली (पुरुष ५७ वर्षे), भोसरी (पुरुष ६५ वर्षे, पुरुष ७८ वर्षे, पुरुष ८३ वर्षे, स्त्री ५३ वर्षे), चिंचवड (पुरुष ६४ वर्षे), आकुर्डी (पुरुष ८५ वर्षे), पिंपळे सौदागर (पुरुष ५२ वर्षे), काळेवाडी (स्त्री ६९ वर्षे), पिंपरी (पुरुष ६८ वर्षे, स्त्री ६० वर्षे, स्त्री ६० वर्षे), वाकड ( पुरुष ७० वर्षे, स्त्री ५८ वर्षे), तळवडे ( पुरुष ५९ वर्षे), चाकण (स्त्री ७६वर्षे, पुरुष ३९ वर्षे), देहुरोड (पुरूष ५३ वर्षे), खडकी (स्त्री ७८ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १३७८४ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३४४७ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण २५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९०४९ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.