- या भागात असणार पुढील काही दिवस निर्बंध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. जुलै. २०२०) : कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी चिंचवड शहरात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, येत्या काळात पिंपरी चिंचवड शहरात रुणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरीकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे.
पिपरी चिंचवड शहरातील परिसर सील करणे आवश्यक आहे. कोविड १९ चा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी व संभाव्य सामुदायीक प्रसार (Community Transfer) टाळण्यासाठी शहरातील नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्याकरीता खालील नमुद परिसर हा Cluster Containment Zone म्हणून सर्वेक्षणाकामी कंटेनमेंट झोनच्या भोवतालचा खालील नमुद परिसर हा Buffer Zone म्हणून आयुक्तांनी गुरुवारी (दि. २३) रोजी घोषित केला आहे.
१) Cluster Containment Zone :- साई उदयान, संभाजीनगर, चिंचवड
Buffer Zone :- (शर्मा आईस्क्रीम – कस्तुरी मार्केट रस्ता – साई उदयान रस्ता – संभाजीनगर बस स्टॉप – रामेश्वर मंदिर रस्ता)
२) Cluster Containment Zone Buffer Zone :- RH 90, शाहूनगर, चिंचवड
Buffer Zone :- (आध्रा टिफीन – गौरी ग्रुप – एचडीएफसी एटीएम – अष्टविनायक विद्यालय
३) Cluster Containment Zone :- मेट्रो पोलीटीअन, दर्शनहॉल जवळ, लिंक रोड, चिंचवड
Buffer Zone :- (मेट्रो पोलीटीअन – सोसायटी विंग – बी)
४ ) Cluster Containment Zone :- भाटनगर, रमाबाईनगर, पिंपरी
Buffer Zone :- (एसटीपी – वाल्मीकी चौक – बिल्डींग नं.१६ – पवना रिव्हर)
५ ) Cluster Containment Zone :- रामनगर, चिंचवड
Buffer Zone :- (परशुराम चौक – दातीर पाटील – संघवीकेशरी रस्ता – ओडोर कंपनी – टाटा सर्व्हिस सेंटर – सेंट ऍण्डास कॉर्नर (पीसीएमसी दुमजी टॉयलेट)
६ ) Cluster Containment Zone :- क्रांतीनगर आकुर्डी
Buffer Zone :- (महाराष्ट्र बैंक – पालखी कमान – विठ्ठल मंदिर – अक्सा मस्जीद – त्रीमुर्ती हॉल – लोकमान्य हॉस्पीटल)
७) Cluster Containment Zone :- दत्तवाडी आकुर्डी
Buffer Zone :- (पालखी कमान – कुटे वृंदावन – सेंट जार्ज चर्च – गणपती मंदिर – साई पुजा सोसायटी)
८ ) Cluster Containment Zone :- गंगानगर, आकुर्डी गावठाण
Buffer Zone :- (गंगानगर एसटीपी – निर्माण हाईटस – म्हाळसाकांत चौक- आकुर्डी दवाखाना नाला)
९) Cluster Containment Zone :- आनंदनगर, चिंचवड
Buffer Zone :- (महावीर चौक – बिग बाझार – कुपर कॉर्नर -चिंचवड स्टेशन पुल (माल धक्का).
उपरोक्त सीमा भागामधील कंटेनमेंट झोन येथील सर्व संबंधित पोलिस ठाण्यांच्या अंकित असलेला कंटेनमेंट परिसर (परिशिष्ट १ ते ९ मध्ये नमूद केल्याप्रमाणे) गुरुवार दि. २३ जुलै २०२० रोजी रात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सदर परिसरातील संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख यांचे मार्फत सील करणे आवश्यक आहे. तसेच सदर कंटेनमेंट परिसरांच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी आहे.
सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. तथापि, १) सदर आदेशान्वये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी व वाहने तसेच शासकीय व सेवा देण्यात येणा-या वाहनांना सदरच्या आदेशानुसार कंटेनमेंट झोन व बफर झोन कार्यवाहीमधून वगळण्यात यावे, २ ) उपरोक्त नमुद कंटेनमेंट झोन क्षेत्रातील नागरिकांच्या बँकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा बंद ठेवाव्यात व केवळ आपली ए.टी.एम.केंद्र कार्यान्वीत ठेवावीत. ३ ) वैद्यकिय विभागामार्फत सर्व क्षेत्रिय कर्मचारी यांनी उपरोक्त नमुद कंटेनमेंट झोन व बफर झोन येथे राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार ६० वर्षाच्या वरीला अअसंसर्गजन्य व दुर्धर आजारांनी व्यक्तींचे सर्वेक्षण दररोज करावे, तसेच पुढील काळात शहरातील सणांची संख्या विचारत घेता टप्याटप्प्याने शहरातील इतर भागात देखील या प्रकारचे निर्बंध लागू करण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी किमान सात दिवसांसाठी लागणारे जीवनाश्यक साहित्य गर्दी न करता प्राप्त करून घेऊन पूर्वतयारी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.


















