न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत थुंकीबहाद्दर आणि मास्क न घालणाऱ्या ६ हजार ७८९ नागरिकांकडून १९ लाख ४९ हजार ७०० रुपयांचा दंड व वसूल करण्यात आला आहे.
रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी १५० रुपये तर, मास्क न घालणाऱ्याकडून प्रत्येकी ५०० रुपये इतका दंड वसूल केला जात आहे. २३ एप्रिलपासून आज अखेर ४ हजार १२८ थुकीबहाद्दरांकडून ६ लाख १९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. तर, मास्क न घालणाऱ्या २ हजार ६६१ नागरिकांकडून १३
लाख ३० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
१४ ते २३ तारखेदरम्यान टाळेबंदीच्या कालावधीत रस्त्यावर थुकणाऱ्या ३५९ जणांकडून ५३ हजार ८५० रुपये इतका दंड वसूल केला. तर, मास्क न घालणाऱ्या ३०७ नागरिकांकडून १ लाख ५३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.


















