न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकच्या वतीने करोनाबाधित नागरिकांची दैनंदिन माहिती अपडेट ठेवण्यासाठी कोविड वॉररुम तयार करण्यात आले आहे. या वॉररुममध्येच करोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. येथील एका डॉक्टरला करोनाची लागण झाली आहे.
आतापर्यंत महापालिकेतील ५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. आतातर करोनाचा मुकाबला करण्यासाठी उभारण्यात आलेल्या वॉररूमध्येच करोनाने शिरकाव केला आहे. वॉररूममधील एका डॉक्टरला करोनाची लागण झाली असून इतर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी केली जाणार आहे. संपूर्ण वॉररूम सॅनिटाइज केले जाईल अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.