न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जुलै. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. आतापर्यंत ६० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पॉझिटिव्ह अधिकारी व कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची विशेष रजा देण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजनेचे काम करीत असताना कोरोनाची लागण झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यास १४ दिवसांची विशेष रजा देण्याची मागणी पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने १६ जुलैला आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी व कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची विशेष रजा देण्याच्या आदेशाला मंजुरी दिली आहे. ही रजा वैद्यकीय रजा म्हणून मंजूर केली जाणार आहे.


















