न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जुलै. २०२०) :- नागपंचमीचा आज शनिवारी (दि. २५) रोजी सण साजरा होत आहे. मात्र, या वेळच्या नागपंचमी सणावर कोरोनाचे सावट असल्याने झिम्मा, फुगडी, फेर हे चित्र दिसणार नाही. नागाची पूजाही घरीच कागदावर, पाटावर नाग काढून करावी लागणार आहे.
दरवर्षी नागपंचमी महिला एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरी करतात. नटूनथटून मंदिरात जाऊन महिला नागाची पूजा करतात. संध्याकाळी झिम्मा, फुगडी खेळतात तसेच फेर धरतात.


















