न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भोसरीतील बालनगरी येथील महापालिकेच्या इमारतीत ४२५ खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्याचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे. पुढील १० ते १५ दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
शहरामध्ये वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णालयातील बेड कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर बालनगरी येथील इमारतीत तात्पुरत्या स्वरुपात कोविड केअर सेंटर तयार करण्याच्या कामाला दोनच दिवसांपूर्वी सुरवात झाली आहे. येथे प्रामुख्याने लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना ठेवण्याचे नियोजन आहे. रुग्णांना राहण्यासाठी व्यवस्था, बेड, स्वच्छतागृह, ऑक्सिजन वाहिनी कामे पालिकेच्या स्थापत्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहेत.