न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- घरात कोणीही नसताना तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. खोलीत पोलिसांना एक चिठ्ठी मिळून आली आहे. चिठ्ठीमध्ये माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. तसेच, बहिणीची काळजी घ्या. आशा आशयाचा मजकूर आहे.
हा तरुण मागील काही दिवसांपासून बेरोजगार होता. तसेच, त्याचा विवाह देखील जुळून येत नव्हता. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना बुधवारी (दि. २९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भोसरी येथे उघडकीस आली. नवनाथ लांडगे (वय २७, रा. भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.