न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोहम योग साधना या संस्थेतर्फे येत्या सोमवार ते शुक्रवार (३ ते ७ ऑगस्ट) असे पाच दिवस मोफत ऑनलाईन योगा प्राणायाम शिबिर आयोजित केले आहे. त्याची वेळ रोज सायंकाळी ५.१५ ते ६.१५ अशी असणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे विनाकारण घबराट निर्माण होताना दिसते. यातून लोक बरे होतात. दैनंदिन योगा व प्राणायाम करणाऱ्यांना त्याचा अधिक फायदा होताना दिसतो. शरिरात प्राणवायूचे प्रमाण कमी होत नाही आणि प्रतिकारशक्तीही चांगली राहते, असे निरीक्षण आहे.
शिबिरात ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी अगोदर नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोहम योग साधना या नंबरवर (मोबाईल – ९७६६६८२८२८) संपर्क साधावा. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभा घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख दिगंबर उचगावकर यांनी केले आहे.















