- पालिका आयुक्तांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात एखाद्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाचपर्यंत रुग्ण पॉझिटिव्ह सापडेपर्यंत तो परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केला जाणार नाही. रुग्ण पॉझिटिव्ह आला. तर, पालिकेकडून फवारणी केली जाईल. केवळ नागरिकांच्या माहितीसाठी कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याचा एक फलक तेथे लावण्यात येईल.
एखाद्या भागात पाचपेक्षा अधिक रुग्ण, सलग-सलगच्या घरांमध्ये किंवा इमारतीत सापडले. तर त्या भागाला किंवा इमारतीला कंटेन्मेंट झोन घोषित केले जाईल. त्याची कडक अंमलबाजवणी करण्यात येईल. या क्षेत्रातून कोणीही बाहेर जावू शकणार नाही. किंवा बाहेरुन कोणीही या भागात येवू शकणार नाही.
झोनमधील नागरिकांना कामाला जाण्यापासून निश्चित अडचण होणार आहे. पण, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोनची गंभीरपणे अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करुन शहरवासीयांना दिली आहे.















