न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २६ नोव्हें) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने रविवारी (दि. २५ नोव्हें.) रोजी प्रभाग क्रमांक ८ इंद्रायणीनगरमध्ये नव्याने विकसित केलेल्या स्केटिंग रिंक ग्राउंडचे राष्ट्रीय खेळाडू कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद असे नामकरण व त्याचे उद्घाटन समारंभ आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमास महापौर राहुल जाधव, क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, माजी महापौर नितीन काळजे, नगरसदस्य नितीन लांडगे, राजेंद्र लांडगे, रवि लांडगे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, स्विकृत सदस्य विजय लांडे, गोपीचंद धावडे, माजी नगरसेवक दत्ता लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता आंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय घुबे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, राष्ट्रीय खेळाडू कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद यांनी कबड्डी या खेळात पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. मैदानांच्या नामकरणाच्या माध्यमातून दिवंगत खेळाडूंच्या स्मृती जतन करण्याच्या प्रयत्नामुळे जास्तीत-जास्त राष्ट्रीय खेळाडू या शहरातून निर्माण होतील.
प्रास्ताविक आकाश कंद यांनी केले तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. आभार क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे यांनी मानले.
















