- लाडशाखीय वाणी समाजामुळेच खासदार झालो….. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मारुंजी / पिंपरी चिंचवड (दि. २६ नोव्हें) :- लाडशाखीय वाणी समाज महासंघाच्या वतीने पुणे (मारुंजी) येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनाचा समारोप रविवारी (दि. २५) केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
माझ्या मतदार संघात लाडशाखीय वाणी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. समाजाचे माझ्यावर प्रेम असल्यामुळेच या मतदारांची ९५ टक्के मते मिळवून मी प्रथम खासदार झालो आणि केंद्रातील महत्त्वाचे संरक्षण राज्यमंत्रीपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी निवड केली, वाणी समाजामुळे मला ही देशसेवेची संधी मिळाली हे ऋण मी विसरणार नाही अशी भावना, या महाअधिवेशनात आल्यानंतर खान्देशात असल्याचा भास होत आहे. वाणी समाजात व्यवहार, कौशल्य आहे. हा समाज उद्योग, व्यवसायातून नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देत आला असून, देश उभारणीत मोलाचा वाटा आहे. ‘व्हीजन’ असेल तर समाज पुढे जातो. पंचसुत्रीनुसार काम केल्यास लाडशाखीय वाणी समाजाचा जगभर झेंडा फडकेल असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे म्हणाले.
यावेळी अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी, स्वागताध्यक्ष आर. एन. वाणी तसेच अनिल चितोडकर, निलेश पुरकर, राजेश कोठवडे, श्यामकांत शेंडे, राजेंद्र मालपुरे, शरद वाणी, विलास शिरोडे, कल्पेश भुसे, राजेंद्र पाचपुते आदींसह राज्यभरातून आलेले ४० हजारांहून जास्त समाज बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. जगदीश चिंचोरे, व्हा. ॲडमिरल सुनिल भोकरे, जयंत वाणी (ओएसडी, मंत्रालय), सुनील भामरे यांचा विशेष उल्लेखनिय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
तत्पुर्वी अध्यक्षीय भाषणात कैलास वाणी यांनी सांगितले, पाच ऑगस्ट २०१८ रोजी पुण्यात बैठकीत ठरले की, नोव्हेंबर महिन्यात असे महाअधिवेशन घेऊ. समाज बांधवांकडून मिळणारे सहकार्य, मदत पाहून महाअधिवेशन यशस्वी होईल याची खात्री झाली. अधिवेशन स्थळी उभारण्यात आलेल्या उद्योग, व्यापार प्रदर्शनातून समाजबांधव कशा प्रकारे विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत कार्य करत आहेत याची माहिती सर्वांपुढे आली. समाजाला आर्थिक सुबत्ता यावी या उद्देशाने ‘वाणी चेंम्बर्स ऑफ कॉमर्स’ ची स्थापना केली. शैक्षणिक सुविधा व कोणीही वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नये या उद्देशाने ५०० जणांना राहता येईल असे वसतीगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सरकारच्या वतीने जागा देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी दिले. त्याचा पाठपुरावा डॉ. भामरे, डॉ. महाजन तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनजंय मुंडे यांनी करावा, अशीही अपेक्षा वाणी यांनी व्यक्त केली.
समाजाची राजकीय ताकद कमी आहे. राजकीय क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी सर्व लाडशाखीय समाज बांधवांनी एकत्र येऊन एक दिलाने काम करुन समाजाच्या उदयन्मुख नेतृत्वास पाठबळ द्यावे. असे आवाहन वाणी यांनी केली.
यावेळी डॉ. भामरे, डॉ. महाजन, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्हाईस ॲडमिरल सुनिल भोकरे, सुकाणू समिती सदस्य विजय शिनकर, वर्षा शिरोडे, दिगंबर शिरोडे, दिपक अमृतकर, विकास अमृतकर, सुनील अमृतकर, निलेश अमृतकर, प्रविण अमृतकर, ऋतूजा अमृतकर, अमित अमृतकर, उदय कोठावडे, प्रशांत कोतकर, भगवान खैरनार, शरद वाणी, मनिष शिरोडे, दिलीप कोठावडे, कैलास कोठावडे, विलास शिरोडे, दिपक महाजन, सुरेश बागड, उषा बागड, शशिकांत येवले, भास्कर कोठावडे, जितेंद्र कोठावडे, योगेश येवले, चंद्रकांत येवले, राजेंद्र पाचपुते, वैशाली भामरे, राजेंद्र अलई, कैलास येवले, सुनील रुकारी, विवेक वाणी, रत्नाकर कोठावडे, बापूसाहेब केळे, प्रशांत पाटे, चंद्रकांत सोनजे, डॉ. विनोद कोतकर, रत्नमाला राणे, दिलीप पाटकर यांचा समाजाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. गिरीष महाजन म्हणाले की, भारत देशाचे नाव जागतिक पातळीवर अर्थ, उद्योग, व्यापार, शिक्षण, वैदयकीय, पर्यटन, उत्पादन, निर्यात, दळणवळण, तंत्रज्ञान या क्षेत्रात आदराने घेतले जावे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी युवा पिढीने अपार कष्ट, मेहनत घेण्याची गरज आहे. वाणी समाज देखील मोठ्या कष्टाने उभा राहिला आहे. ही घोडदौड अशीच सुरु ठेवण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे. शासनाने उद्योग, व्यवसायांच्या उभारणीसाठी अनेक योजना आणल्या आहेत. या संधीचा नव उद्योजकांनी फायदा घेतला पाहिजे. कुठलीही अपेक्षा न बाळगता कार्य करीत राहिले तर यश नक्कीच मिळते. मी जलसंपदा खात्याचा मंत्री आहे. पंधरा वर्ष अजित पवार हे या खात्याचे मंत्री होते. हे खाते सांभाळत असताना एक ही शिंतोडा उडू देणार नाही, अशी खात्री डॉ. महाजन यांनी दिली.
डॉ. महाजन म्हणाले की, स्व. प्रमोद महाजन यांनी १९९५ मध्ये मला विधानसभेची उमेदवारी दिली. ज्या जामनेर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतो तेथे माझ्या समाजाचे केवळ अडीच हजार मतदार आहेत. असे असूनही मी पाच वेळा आमदार झालो. पैसा आणि जाती, पातीचा निवडणूकीमध्ये उपयोग होत नाही तर तुम्ही समाजाच्या कसे उपयोगी पडता यावर यश, अपयश अवलंबून असते. डॉ. भामरे यांनी अधिवेशनास उपस्थित राहून आताच निवडणूकीचा नारळ फोडला आहे. येथे येऊन लाडशाखीय वाणी समाजाशी संवाध साधता आला याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. वाणी समाज शिस्तप्रिय संस्कृती जपणारा व इतरांनाही सामावून घेणारा आहे असे डॉ. महाजन यांनी सांगितले.
अधिवेशनास देशभरातून चाळीस हजारांहून जास्त लाडशाखीय वाणी समाज बांधव उपस्थित होते. सुत्रसंचालन राहुल सोलापूरकर, समिरा गुजर, आभार शामकांत वाणी यांनी मानले.
















