न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट. २०२०) :- थेरगाव येथील एका गोडावूनमध्ये सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेजारील गोडाऊनमधून धूर निघत असल्याचे सोसायटीमधील नागरीकांच्या लक्षात आले. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाला कळविण्यात आले.
तसेच सोसायटीमधील नागरीकांनी या गोडावूनमध्ये पाणी टाकण्यास सुरुवात केली. परंतू थोड्या वेळातच गोडाऊनमध्ये मोठा स्फोट झाला. त्यामुळे नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
प्राथमिक अंदाजानुसार या गोडाऊनमध्ये असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशामक दलाची गाडी येथे दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत














