- एका रो हाऊसची अंदाजे किंमत १ कोटीपेक्षा अधिक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक सहामध्ये १६ रो हाऊस उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या ७ कोटी ३२ लाख ९७ हजार रुपयांच्या खर्चास सभेत तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर मोशी, पेठ क्रमांक सहामध्ये पाण्याच्या टाकीजवळ ३४ हजार ८६४ चौरस फूट (३२३९ चौरस मीटर) क्षेत्राचा भूखंड आहे. संबंधित भूखंडात १६ रो हाऊस उभारण्याचे नियोजित आहे.
एका रो हाऊसची अंदाजे किंमत १ कोटी ते १.१० कोटी इतकी असेल. प्रत्येक रो हाऊस हाऊसचे कार्पेट क्षेत्र सुमारे ११९२ चौरस फूट (११०.७४ चौरस मीट ) इतके असणार आहे. संबंधित कामास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. संबंधित काम दीड वर्षांच्या मुदतीत पूर्ण केले जाणार आहे.
इंद्रायणीनगर, पेठ क्रमांक तीनमध्ये स्केटींग ग्राऊंडसमोर आणि मोशी, पेठ क्रमांक चारमध्ये साईनाथ हॉस्पिटलमागे दोन उद्यान उभारण्यात आलेले आहे. संबंधित उद्यान महापालिकेला हस्तांतरित केलेले आहे. या उद्यानांचे महापालिकेला हस्तांतर करण्यापूर्वी झालेल्या देखभाल व दुरूस्तीच्या खर्चास सभेत मंजुरी देण्यात आली.
















