न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. ऑगस्ट. २०२०) :- पीडित अल्पवयीन मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून प्रेम संबंध ठेवले. १५ जुलै २०१८ पासून ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत पीडित मुलीला भाटनगर येथील राहत्या घरी, काळेवाडी, शिरगाव आणि रावेत येथील लॉजवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
अल्पेश हनुमंत कांबळे (वय २२, रा. भाटनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















