मागील बऱ्याच दिवसापासून बी-टाऊनमध्ये सलमान खानच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. ‘माल्टा’ येथील या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून नुकताच चित्रपटाचा पहिला लुक रिलीज करण्यात आला आहे. कॅटरिनासोबतचा एक फोटो खुद्द भाईजाननेच त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.’माल्टा’तील शूटींग पूर्ण झाल्याची माहिती ‘भारत’ चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी दिली आहे. या चित्रपटातील फक्त सलमान खानचाच लूक आत्तापर्यंत समोर आला होता, पण माल्टातील एक फोटो काही दिवसांपूर्वी कॅटनेही शेअर केला होता. तिने नुकताच सलमान खानची बहीण अलवीरा खान अग्निहोत्री हिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. सलमाननेही त्याच्या आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
भाईजानचा ‘भारत’ या चित्रपटाचा चा पहिला लूक रिलीज !


















