न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २९ नोव्हें) :- गॅलक्सी प्री. प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका व राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ, पिंपरी-चिंचवड महिला सचिव माधवी जनार्दधनन यांच्यावतीने मोशी-प्राधिकरण परिसरात नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
समाजसेवेचे व्रत जपत गेल्या दोन वर्षांपासून माधवी जनार्दधनन स्वतःच्या खर्चातून आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखण्याचा उपक्रम करीत आहेत. त्या समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगत, आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनाही या स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेतात.
काही वेळेस अज्ञानी व्यक्तींकडून स्वच्छता मोहिमेस विरोध होतो. परंतु, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असते, आपल्या घरातील, अंगणातील स्वच्छतेची जबाबदारी सरकारची नसून आपली आहे. या बाबी पटवून दिल्यानंतर विरोध करणारे नागरिकही या मोहिमेत सहभागी होतात. महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी या मोहिमेस सहकार्य करीत असल्याचे माधवी जनार्दधनन यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.
















