न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २९ नोव्हें) :- महाराष्ट्र थायबॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड थायबॉक्सिंग संघटनेच्यावतीने शुक्रवार दिनांक २३ ते २५ नोव्हेंबर यादरम्यान १३ वी राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धा चिंचवडगावातील मोरया मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस महाराष्ट्रातून २६ जिल्हे व ६ महानगरपालिकांचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धा संयोजन पी. वाय. अत्तार, जमीर शिकलगार, नाजिम शेख, महादेव खराडे, जैद शेख यांनी केले होते.
यावेळी चिंचवडचे पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, सज्जी वर्गी (उद्योजक), पुजा सराफ, चेतन गावडे, पी वाय, अत्तार, कार्याध्यक्ष, एस डी गायकवाड सचिव, दोघेही महाराष्ट्र थायबॉक्सिंग असो. पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते.
यात सांघिक चषक अनुक्रमे १ पिंपरी चिंचवड २ रायगड ३ औरंगाबाद ४ पुणे शहर या संघांनी पटकाविले. स्पर्धेत बेस्ट फायटर हा किताब सना शेख व
आसिफ़ शेख यांनी पटकाविला. बेस्ट रेफरी हा किताब साक्षी देशपांडे व संतोष मिरगे, बेस्ट परफोरमन्स हा किताब सुरेश कोळी यांना मिळाला. स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंची निवड पंजाब येथे दिनांक ०५ ते ०७ जानेवारी २०१९ ला होणा-या राष्ट्रीय थायबाॅक्सिंग स्पर्धेसाठी झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील निवड झालेले खेळाडू गोवा येथील फेब्रुवारी २०१९ ला होणाऱ्या वल्ड कप थायबाॅक्सिंग स्पर्धेत हेच खेळाडूं सहभाग घेऊ शकणार आहेत.
















