न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हें) :- इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने मुंबई येथे आयोजित केलेल्या मॅस्ट्कॉन २०१८ या वैद्यकीय परिषदेत इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड, भोसरी शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवधर यांना उत्कृष्ट अध्यक्ष, तर तर डॉ संजीव दात्ये यांना उत्कृष्ट सचिव पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
पिंपरी चिंचवड भोसरी ही २०१४ शाखापासून कार्यरत आहे. डॉक्टर व रुग्णाच्या हितासाठी झटणारी संस्था आहे. या शाखेत वैद्यकीय क्षेत्रातील सध्या ६०३ सभासद आहे.
तसेच पिंपरी-चिंचवड- भोसरी शाखेच्या वतीने सुरू केलेल्या स्पंदन त्रैमासिकाला मिळाला उत्कृष्ट बुलेटीन पुरस्कार संपादक डॉ राकेश नेवे यांना तर सर्वाधिक सभासद नोंदणी केल्याबद्दल मिळालेला पुरस्कार डॉ. संजीव पाटील यांनी स्वीकारला. पिंपरी चिंचवड भोसरी शाखेला चार पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ वाय एस देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
















