न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- यापुढे खासगी इस्पितळांमध्ये उपचार घेत असलेल्या गरीब कोरोना बाधित व्यक्तींना शासनाकडून रेमडेसिविर हे जिवाणू प्रतिबंधक इंजेक्शन मोफत दिले जाईल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना टोपे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले. ते म्हणाले, विदर्भ, मराठवाड्याकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले नाही. मुख्यमंत्री सातत्याने आढावा घेत असतात. राज्यात केवळ १८ टक्के कोरोना रुग्ण खासगी इस्पितळात उपचार घेत असून बाकी सगळे सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेत आहेत. शासनाची केवळ एक प्रयोगशाळा होती, आता ३११ प्रयोगशाळा