न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रामधे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार येणार आहे. त्यासाठी येत्या गुरुवारी (दि. १०) पाणी पुरवठा बंद राहील. तर, शुक्रवारी कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होईल, असे औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. कोतवाड यांनी दिली.
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत जलशुद्धीकरण प्रकल्प बंद राहील. त्यामुळे पिंपरी – चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अॅण्ड डी, व्हीएसएनएल, दिघी, तळवडे, चाकण, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागातील पाणी बंद राहणार आहे.


















