न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक साहेबराव दगडू खरात यांचे मंगळवारी (दि. ८) रात्री कोरोनामुळे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. साहेबराव खरात यांना गुरुवारी (दि. ३) कोरोनाची लागण झाली होती.
त्यांच्यावर भोसरीतील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्यांना निमोनिया झाला होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे सोमवारी नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे















