न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाल्याने त्यांच्याकडील खरेदीचे आर्थिक अधिकार काढून घेण्यात आले आहेत. ते अधिकार अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. तसा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी (दि. ९) काढला आहे.
डॉ . रॉय यांच्याकडे आरोग्य विभागासह कीटकनाशक विभागाचे कामकाज, भारत व महाराष्ट्र अभियान व पशुवैद्यकीय विभागाचा कार्यभार आहे. एका ठेकेदाराकडून थेट आपल्या वैयक्तिक बँक खात्यात रक्कम स्वीकारल्याबद्दल त्यांची खातेनिहाय चौकशी लावण्यात आली आहे. परिणामी, त्यांचे वित्तीय व खरेदीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. ते अधिकारी अतिरिक्त आयुक्त पवार यांच्याकडे देण्यात आले आहेत.


















