न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हें.) :- मुंबई (बोरीवली) येथील खेळाच्या मैदानाचे सुशोभीकरणाची पाहणी करीत असताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महिलांना उद्देशून निंदनीय वक्तव्य केले आहे.
या वक्तव्याचा तिरोडा विधानसभा गोंदीयाचे शिवसेना संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी जाहीर निषेध केला आहे. माता- भगिनीबद्दल अशी भाषा वापरणे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शोभत नसून, यापुढे असे बेताल वक्तव्य केले तर शिवसेना खपवून घेणार नसल्याचे युवराज दाखले यांनी सांगितले आहे.
















