- पुन्हा लॉक डाऊनच्या निव्वळ अफवा – सहाय्यक आयुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर. २०२०):- पुण्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गरज असल्यास पुन्हा जनता संचारबंदी लागू करा, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी प्रशासनाला केली. संचारबंदी करताना नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घ्या, असेही पवार यांनी सांगितले.
करोना सद्य:स्थितीबाबत आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी या सूचना दिल्या. विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के . वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कु मार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह इतर संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.
जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी अन्य राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जनता संचारबंदी मोठय़ा प्रमाणात राबवण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पवार म्हणाले, ‘गरज असल्यास पुण्यातही जनता संचारबंदी लागू करा. मात्र, हे करताना नागरिकांना त्रास आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही. याबाबत खबरदारी घेण्यात यावी.
पिंपरी – चिंचवड शहरात पुन्हा लॉक डाऊन करण्याबाबत कोणतीही चर्चा अथवा निर्णय झालेला नाही. सोशल मीडियावर येणारे मेसेज या अफवा आहेत. नागरिकांनी अशा या चुकीच्या मेसेजमुळे घाबरुन जाऊ नये. पालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन सुरक्षित राहणे महत्वाचे आहे.– संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त, महापालिका प्रशासन.