- नागरिकांनो मुदतवाढीचा फायदा घेऊन जास्तीत-जास्त अर्ज भरा – महापौर ढोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर. २०२०):- केंद्र शासन व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने रावेत, बो – हाडेवाडीव च-होली येथे अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुमारे ३७०० सदनिकांचे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासाठी १७ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
परंतु, कोरोना लॉकडाऊनमुळे नागरिकांना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला मिळण्यासाठी नागरिकांना पुढील १५ दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे.
पिंपरी – चिंचवड ही औद्योगिकनगरी आहे. कामाच्या निमित्ताने येथे गोरगरीब नागरिक वास्तव्यास आहेत. सध्याच्या कोरोनाच्या संकटात व अनेकांचे व्यवसाय बंद व नोकरी गेली आहे. त्यामुळे नागरिकांना अर्थिक अडचणी आहेत. या समस्या हेरून महापौर ढोरे यांनी आयुक्तांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या योजनेसाठी आतापर्यंत १४ हजार अर्ज दाखल झाले आहेत. नागरिकांनी मुदतवाढीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त अर्ज दाखल करावेत, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.