न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर. २०२०):- शहरामध्ये वाहन चोरीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. सात घटनांची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे. श्रद्धा रवींद्र कुदळे (वय ४६, रा. एचडीएफसी कॉलनी चिंचवड) यांची सोसायटी जवळ लावलेली गाडी ७ सप्टेंबर रोजी सकाळी चोरीला गेली असल्याची तक्रार एमआयडीसी भोसरी ठाण्यात दाखल झाली आहे.
अतुल श्यामराव कुलकर्णी (वय ३२, रा. सिंधुनगर प्राधिकरण, निगडी) यांची घराजवळ लावलेली दुचाकी २५ ते २६ ऑगस्ट दरम्यान चोरल्याची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
विजयकांत हरिप्रसाद पांडे (वय ३८, रा. खालुंब्रे ता. खेड) यांची दुचाकी चोरुन नेल्याची तक्रार दाखल झाली आहे.
माणिकदन शंकर स्वामी (वय ३०, रा. कृष्णा चौक सांगवी) यांची गाडी राहत्या ठिकाणाहून चोरुन नेल्याची नोंद सांगवी पोलीस ठाण्यात झाली आहे.
पिटर सुरेश साळवे (वय ३७, रा. वेणूनगर वाकड) आणि गणेश बबन घाडगे (वय २८, रा. वाकड) यांची दुचाकी राहत्या घराजवळून चोरीस गेल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
राहुल भीमराव साळंके (वय २६, रा. खालुंब्रे, ता. खेड) यांची दुचाकी खालुंब्रे येथील बडवे इंजिनिअरींगच्या गेटसमोरुन चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.


















