न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर. २०२०):- नगरसेविकेच्या मोबाईल फोनवरील संभाषण कनिष्ठ अभियंत्याने रेकॉर्ड करून ते दुसऱ्या नगरसेवकाला ऐकविल्याची तक्रार पालिकेच्या २१ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहायक आयुक्त संदीप खोत यांची नियुक्ती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली आहे. नगरसेवक विविध प्रकारच्या कामांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करतात, त्यांचा कॉल रेकॉर्ड करणे व तो दुसऱ्यांना ऐकविणे ही बाब गंभीर व खेदजनक आहे. याप्रकरणी चौकशी करून त्यांचा गोपनीय अहवाल २५ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.