न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २९ नोव्हें) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाकड ते नाशिक फाटा बीआरटी मार्गावरील गोविंद यशदा चौक येथे सब-वेच्या कामाची नगरसेवक नाना काटे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. कामाची प्रगती पाहून नाना काटे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कामाची घाई करण्याच्या सूचना केल्या.
या सब-वेच्या कामाचा एप्रिल महिन्यात शुभारंभ झालेला असून, वेळेच्या आत ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेऊन नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून देणार असल्याचे नाना काटे यांनी सांगितले.
घटनास्थळी कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, उपभियंता संजय काशीद, उपभियंता साळी, कनिष्ठ अभियंता धाडे, ठेकेदार खोसे, ठेकेदार एस. एस. साठे, लिनियर गार्डनचे प्रकल्प सल्लागार धीरज पाटील आदी उपस्थित होते.
















