न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- चिखली परिसरात एक तरुण विद्युत प्रवाह असलेल्या हायटेंशन तारेला चिटकला होता. मात्र, काही क्षणात तो फेकला गेला. काही कळायच्या आत त्याच्या अंगावरील कपडे जळून गेले. यात तो गंभीर भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अद्याप जखमी असलेल्या तरुणाच नाव समजू शकलेलं नाही. हा तरुण पत्र्याच्या छतावरील भंगार जमा करत होता. तेव्हा, ही दुर्घटना घडली अशी माहिती येथील स्थानिकांकडून मिळाली आहे.















