न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिका क्षेत्रातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, कर नोंदणी न झालेल्या मिळकतींचा शोध घेण्यात येणार आहेत. नवीन, वाढीव व वापरात बदल अशी माहिती उपलब्ध होणार आहे. विनानोंद मिळकतींचे उत्पन्न वाढीतून ६.६६ टक्के रक्कम शोध घेणाऱ्या संस्थेस देण्यात येणार आहे. या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली.
महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने मिळकतींचा शोध घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार ओरिनपो सोल्युशनसने सर्वेक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली होती.
महापालिका कार्यक्षेत्रातील सर्वेक्षणामध्ये सापडलेल्या नवीन मिळकतीची माहिती, यादीनुसार संबंधित विभागीय कार्यालयामार्फत मिळकतकर आकारणीची कार्यवाही पूर्ण करून मिळकतधारकास मिळकतीचे बीलांच्या रकमेवर ६.६६ टक्के रक्कम देण्याचा विषय स्थायी समितीसमोर ठेवला होता. मिळकत सर्वेक्षण निविदेप्रमाणे कामकाजाचे बील करसकलन विभागाकडील मिळकत सर्वेक्षण या लेखाशिर्षमधून खर्ची टाकण्यास मान्यतेचा प्रस्ताव स्थायीपुढे होता. त्यातील लघुतम ओरिनो सोल्युशन्सला कार्यारंभ आदेश देन्यास स्थायीने मान्यता दिली आहे.















