न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, कला, क्रीडा व सांस्कृतिक आणि शिक्षण या समितीच्या सदस्यांची निवड ६ ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे.
त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक नगरसेवकांनी अर्ज करावेत, असे आवाहन शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शुक्रवारी (दि. २५) केले आहे. अर्ज गुरुवारी (दि. १) सायंकाळी पाचपर्यंत विरोधी पक्षनेते कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. प्रत्येक समितीमध्ये ९ सदस्य असतात. महापालिकेतील नगरसेवक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना प्रत्येक समितीवर संधी मिळणार आहे.