न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- मास्कचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यासह विनाकारण घराबाहेर पडून प्रशासनाच्या नियमांचे काही नागरिकांकडून उल्लंघन केले जात आहे. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अशा ९३ नागरिकांवर शनिवारी पोलिसांनी खटले दाखल केले.
भादंवि कलम १८८ अन्वये ही कारवाई झाली. पिंपरी – चिंचवड पोलिसांनी शनिवारी एमआयडीसी भोसरी (५), भोसरी (२), चिंचवड (४), निगडी (७), आळंदी (१), दिघी (१४), सांगवी (१८), वाकड (११), हिंजवडी (२४), चिखली (७) या ठाण्यांतर्गत ९३ जणांवर खटले दाखल केले. नागरिकांनी मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.















