- गणेशनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आ. बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी गावातील गणेशनगर येथे ‘एसआरए’ अंतर्गत राबविण्यात येत असलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मॉडेल ठरावा, अशी अपेक्षा आमदार अण्णा बनसोडे यांनी येथे व्यक्त केली. एसआरएअंतर्गत पिंपरी गावातील सर्वे नंबर २३३ गणेशनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार बनसोडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक डब्बू आसवाणी, उषा वाघेरे, संदीप वाघेरे, निकिता कदम, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, गिरीजा कुदळे, शांती सेन, सुरेश लोंढे आदी उपस्थित होते.
आमदार बनसोडे म्हणाले, पिंपरी – चिंचवड शहरात ७२ ते ८० झोपडपट्ट्या आहेत. गणेशनगर प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवला तर हा प्रकल्प एक आदर्श मॉडेल होईल. या प्रकल्पांतर्गत ३ लाभार्थ्यांना चारशे ते साडेचारशे स्क्वेअर फूट घर मिळेल. इमारतीत लिफ्ट, बालवाडी, डिस्पेन्सरी असेल. वार्षिक मेंटेनन्स सोसायटीच्या नावावर जमा केलेला असेल. अठरा महिन्यांत बांधकाम पूर्ण होईल, असे आमदार बनसोडे यांनी सांगितले. अपात्रांना पात्र करून गेली ३०-४० वर्षे एकत्र राहिलेले लोक पुन्हा गुण्यागोविंदाने राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.















