न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दखल करण्यात आला. हा प्रकार चिंचवड परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक राजू ठुबल यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वसीम कमाली शेख (रा. बिजलीनगर, आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी वसीम शेख याने ३० एप्रिल रोजी सकाळी त्याच्या फेसबुक पेजवर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केले. याबाबत एका सामाजिक संस्थेला माहिती मिळाली. त्यानुसार, संस्थेने एक अहवाल पोलिसांकडे सादर केला. या अहवालावरून वसीम शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चिचवड पोलिस करीत आहेत.















