- कोरोनाचे संक्रमण अधिक वाढण्याचा धोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- रेशन वाटपासाठी असलेली बायोमेट्रिक पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दररोज करोनाचे हजाराच्या आसपास रुग्ण सापडत असताना, पुन्हा बायोमेट्रिकचा पर्याय स्वीकरल्याने कार्डधारक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण असून करोनाचा धोका वाढला आहे.
करोनामुळे राज्यात मृतांची संख्या वाढत आहे. करोनाबाधितांची लाखाच्यावर संख्याही राज्यात पोहोचली आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले. मार्च महिन्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिकांना शासकीय स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा आधार मिळाला. मात्र , करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीला स्थगिती देण्यात आली.
रेशन दुकानामध्ये दररोज येणाऱ्यांमध्ये झोपडपट्टी, चाळमधून येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. या सर्वांना बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक केल्यास करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे. सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे. सरकारने पुन्हा लोकांच्या आयुष्याशी खेळू नये. तसेच, जोपर्यंत करोनावर अधिक प्रमाणात मात करता येत नाही, तोपर्यंत बोयोमेट्रिक पडताळणीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स असोसिएशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी शासनाकडे केली आहे.















