- आमदार महेशदादांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक संतोष बारणे मित्र परिवाराचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- कोरोनाच्या संकटकाळात गरजू रुग्णांसाठी रक्त आणि प्लाइमादान कारण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केले आहे. त्यालाच प्रतिसाद देत भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक संतोषभाऊ बारणे मित्र परिवार व कर्तव्यम फाउंडेशन यांच्या वतीने मोशीतील सिल्व्हर नाईन सोसायटीमध्ये प्लाझ्मादान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. चिचवड येथील मोरया ब्लड बैंकच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरामध्ये १० कोरोना योद्ध्यांनी प्लाझ्मादान केले, तर ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आमदार महेशदादा लांडगे यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. तसेच सर्व आयोजकांचे व प्लाइमा व रक्तदात्यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना उद्योजक संतोष बारणे यांनी सांगितले की, ” आज कोरोना परिस्थिती पाहता प्लाइमा व रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी समाजातील विविध सामाजिक संघटना व संस्थानी पुढाकार घेणे गरजेचे आहे. या संकटकाळात माणूस म्हणून आपणच आपल्या लोकांची मदत करू शकतो, शासकीय यंत्रणा त्यांची जबाबदारी पार पाडत आहे, पण त्यासोबतच आपण सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
यावेळी आमदार महेशदादा लांडगे, माजी सैनिक विजय आवटे, माजी पोलीस कर्मचारी रामचंद्र तापकीर, नागेंद्र उबळे , सतीश साके , पोलीस वेलफेयर मोशी विभागाध्यक्ष शाम मरके आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सिल्व्हर नाईन सोसायटी, स्वराज सोसायटी तसेच मौशी परिसरातील सर्व सोसायटीतील रहिवासी व नागरिक उपस्थित तसेच शाम मार्के, नेल ठाकुर, सागर भोगाडे , सतीश खरात , सतीश बोरकर , गणेश निकम , अमोल बडगुजर , प्रशांत जाधव , उमेश पाटील , बडु मजगे , विक्रांत सोनवणे , सुनील सांवत , मेघनाथ आवटे , संदिप जाधव , भुषण चव्हाण , अरुण गायकवाड , संदीप पाटील , योगेश चौधरी , विठ्ठल आहिरे , आप्पासाहेब कोळी , गणेश माडे , विकास पाटील , सचीन साके, नागेंद्र उबरे आदी उपस्थित होते.
उद्योजक संतोषभाऊ बारणे व कर्तव्यम फाउडेशनचे राकेश गायकवाड यांनी आभार मानले.















