- रविवारी ८१२ जणांना कोरोनाची बाधा तर, २२ जणांचा मृत्य; ९१४ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. २७ सप्टेंबर) रोजी ८१२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ९१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे आकुर्डी(पुरुष ७१ वर्षे), भोसरी (पुरुष ७० वर्षे, पुरुष ७५ वर्षे पुरुष ६७ वर्षे), पिंपरी (पुरुष ५८ वर्षे), दिघी(पुरुष ५६ वर्षे, पुरुष ५५ वर्षे), काळेवाडी (पुरुष ६५ वर्षे). निगडी (पुरुष ५६ वर्षे पुरुष ७३ वर्षे), वाल्हेकरवाडी(पुरुष ७४ वर्षे) च-होली (स्त्री ७४ वर्षे), सांगवी (स्त्री ६१ वर्षे), संततुकाराम नगर, पिंपरी (पुरुष ४८ वर्षे), चिखली (पुरुष ५४ वर्षे) येथील रहिवासी आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७६०७९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६७२९६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १२८० जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















