- धोकादायक स्पीडब्रेकर्स दुरुस्तीसारखी कामे हाती घ्या – गोडांबे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- भोसरीतील मुख्य पीएमटी चौकातील उड्डाणपुलालगत असलेल्या सेवा रस्त्यावरील फुटपाथची रुंदी काही मीटरने वाढविण्याचे काम काही दिवसांपूर्वी महापालिका व बीआरटीएस यांनी अर्बन स्ट्रीट डिझाईनच्या नावाखाली सुरु केले आहे. येथील बहुतांश व्यापारी यांचा या कामाला विरोध आहे.
वास्तविक रस्त्याची रुंदी कमी असताना फुटपाथची रुंदी वाढवून रस्त्याची रुंदी कमी करण्याचे कारण काय? यामुळे पार्किंगची समस्याही बहुतांश दुकानदारांकडे येणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. तसेच रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. मोठया फुटपाथची मुळात गरजच काय? यावर छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण होणार ते वेगळेच.
उड्डाणपुलाखाली नागरिकांसाठी मोफत पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे. त्यामुळे फुटपाथची रुंदी वाढविणे चुकीचं आहे. हे काम थांबवून बेकायदेशीर व धोकादायक स्पीडब्रेकर्स दुरुस्तीसारखी इतर आवश्यक गरजेची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.















