न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- नातेवाइकांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घालत कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची आणि ईसीजी मशीनची मोडतोड केल्याची घटना वाकड येथील एनआरएस हॉस्पिटलमध्ये घडली.
याप्रकरणी चौघा व्यक्तींविरोधत गुन्हा दाखल केला आहे. डॉ. नारायण सुरवसे (वय ४६, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
करीम शेख, मुख्तार शेख आणि दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीसह दहा ते पंधरा जण एका बेशुद्धावस्थेतील व्यक्तीस रुग्णालयात घेऊन आले होते. डॉक्टरांनी तपासले असता रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्तार आणि करीम शेख यांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
हॉस्पिटलचे सुरक्षारक्षक, सिस्टर आणि मावशीला हाताने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सलीम शेख हा इसम घरीच बेशुद्ध पडला होता. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांचा ईसीजी काढला. तेव्हा हृदयाचे ठोके बंद पडले होते. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















