न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- महापालिका हद्दीसह विविध उपनगरांत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. असे असतानाही अनलॉकमध्ये अनेक नागरिक घराबाहेर पडताना मास्क घालत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींविरोधात रावेत पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून मागील दीड महिन्यात एक लाख तेवीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गणेश नागरगोजे, गणेश गोफण, नंदलाल राऊत, विजयकुमार वाकडे, संजय जाधव यांचे पथक कारवाई करीत आहे.
महापालिकेच्या हद्दीत दररोज ८०० ते १००० च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. अनलॉकमध्ये नागरिकांचा बाजार, बँका, कार्यालये आदी ठिकाणी वावर वाढला आहे. मास्क न घातल्यास पोलिसांकडून ५०० रुपये दंड आकारला आहे. अनलॉकमध्ये मास्क न वापरणाऱ्यांचा शोथ पालिकेचे पथक पोलिसांच्या मदतीने घेत आहेत.


















