न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- सातारा येथून पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने विनापरवाना गोमांस विक्रीकरीता घेवून जात असलेला टेम्पो शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेत दोन टन गोमांस जप्त केले आहे.
याप्रकरणी टेम्पोचालक अफरोज सामील शेख (वय २५) व शिराज अहमद अन्सारी (वय ३४, दोघेही रा. कुर्ला, मुंबई) यांना शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरगाव पोलिसांनी अखिल भारत कृषी गोसेवा संघ व मावळ तालुका विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या मदतीने सापळा रचून साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने विनापरवाना गोमास घेवून निघालेला टेम्पो ताब्यात घेऊन चौकशी केली असता आतमध्ये मास आढळून आले.


















