न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२०) :- राही – माई प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त अहिंसा गौरव पुरस्कार देण्यात येतो. करोनाकाळात सेवा देणाऱ्या करोना योद्ध्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
राही – माई प्रतिष्ठानच्या वतीने अहिंसा गौरव पुरस्कार २०२० डॉ. सचिन पाटील ( तालेरा या हॉस्पिटल ), रोहिदास बो-हाडे (सांगवी पोलीस स्टेशन), राजेंद्र सावंत, गणेश धामणगावकर, गोविंद चव्हाण, सोमनाथ असवले, अशिष उबाळे, राम पवार, सुनील चव्हाण (आरोग्य विभाग) यांना राही – माई प्रतिष्ठानच्या वतीने जवाहर ढोर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
करोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता यांनी सेवा दिली. त्यामुळे त्यांचा आज सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस, आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.