न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात रेस्टॉरंट्स, बार, फूड कोर्स आज सोमवार (दि. ५) पासून ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास पिंपरी – चिंचवड महापालिकेने शुक्रवारी (दि. २) परवानगी दिली आहे. तसेच रेल्वे व लोकल प्रवासी वाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी वरील आदेश काढले आहेत.
हॉटेल व लॉज यांना १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास पालिकेने २ सप्टेंबरला परवानगी दिली आहे. ती कायम ठेवण्यात आली आहे. रेस्टॉरंट्स, बार व फूड कोर्ट्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महानगर प्राधिकरणाप्रमाणे पिंपरी – चिंचवड शहरातील रेल्वे व लोकल प्रवासी वाहतुक सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. समन्वय ठेवण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त हे नोडल अधिकारी आहेत.


















