- अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून एकही अर्ज नाहीच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहरातील ८ क्षेत्रीय कार्यालय समिती अध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केला आहे. त्यांनी याबाबत महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यानुसार आज सोमवारी (दि. ५) रोजी अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिवस होता. अर्ज भरण्यासाठी आज दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ होती. या मुदतीत केवळ भाजपचे अर्ज आले. विरोधातील शहर राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरले नाहीत. त्यामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सर्वच समित्यांवर भाजपचे अध्यक्ष बिनविरोध निवडून येणार आहेत. पालिकेच्या एकूण ३२ प्रभागानुसार ८ क्षेत्रीय समिती कार्यालय आहेत. त्या समितीवर ४ प्रभागातील १६ नगरसेवकांमधून अध्यक्ष निवडला जातो. प्रभाग अध्यक्षांचा वर्षभराचा कार्यकाळ एप्रिल २०२० ला संपला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह सभापती पदाची निवडणूक (दि. ०९ ऑक्टोबर) रोजी प्रेरणा देशवतार, भा.प्र.से. आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांचे अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात व्हिडीओ कॉनफ्रसद्वारे होणार आहे.
यांनी भरले अर्ज…
भाजपकडून ‘ अ ‘ प्रभाग अध्यक्षपदासाठी शर्मिला बाबर, ‘ ब ‘ प्रभाग सुरेश भोईर, ‘ क ‘ प्रभाग राजेंद्र लांडगे, ‘ ड ‘ प्रभाग सागर आंगोळकर, ‘ ई ‘ प्रभाग विकास डोळस, ‘ ग ‘ प्रभाग बाबा त्रिभुवन, ‘ ह ‘ प्रभाग हर्षल ढोरे आणि ‘ फ ‘ अध्यक्षपदासाठी कुंदन गायकवाड यांनी अर्ज भरला आहे.


















