न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर. २०२०) :- विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नेहरूनगर व अॅटो क्लस्टर येथे उभारण्यात आलेल्या कोविड-१९ सेंटरची आज पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते. कोविड-१९ सेंटरच्या बाबतीत येणाऱ्या समस्या व उपाययोजना बाबत चर्चा करण्यात आली.


















