- मंगळवारी ४५० जणांना कोरोनाची बाधा तर, २३ जणांचा मृत्यु; ८८२ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (देि. ०६ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ०६ ऑक्टोबर) रोजी ४४९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महापालिका हद्दीतील ९ पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मोशीतील ४२ वर्षीय पुरुष, रावेत ५८ वर्षीय, चिंचवड ६२ वर्षीय, चिखलीतील ४४ वर्षीय, आकुर्डीतील ७० वर्षीय, दिघीतील ४४ वर्षीय, कासारवाडीतील ६० वर्षीय, किवळेतील ७४ वर्षीय, पिंपळे सौदागर येथील ५८ वर्षीय पुरुषाचा आणि चिंचवड येथील ६३, ५८ वर्षीय महिला, किवळेतील ५७ वर्षीय, आकुर्डीतील ७४ वर्षीय वृद्ध महिला, कुदळवाडीतील २४ वर्षीय तरुणी अशा ०५ स्त्रियांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले ०८ पुरुष रुग्ण हे कुरुळी ७८, ५२ वर्षीय, भवानी पेठेतील ३९ वर्षीय, हिंगोलीतील ६२ वर्षीय, सातारा ५२ वर्षीय, धानोरीतील ७३ वर्षीय, मुंढवा ६५ वर्षीय, खेड ४० वर्षीय पुरुषाचा तर हडपसर येथील ५६ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८१३७२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७५३८६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १३८८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















