- सर्वपक्षीय नगरसेवकांकडून हाथरस घटनेचा निषेध…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (देि. ०६ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज मंगळवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. सभेत सत्ताधारी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी हाथरस घटनेचा निषेध नोंदविला. ‘श्रद्धांजली’ कार्यक्रमाच्या निमित्ताने हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेवर सर्वांनी मते व्यक्त केली.
नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, सुजाता पालांडे, मनसे गटनेते सचिन चिखले, आशा शेंडगे, एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, गटनेता राहूल कलाटे व इतर नगरसेवकांनी कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहिली.
महिला सुरक्षेसाठी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली. सरकार कुणाचेही असो महिलांवर अत्याचार होत असतील तर ही बाब चांगली नाही. महापालिकेच्या गार्डनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, महिलांची छेडछाड होत आहे पोलीस आयुक्त यांच्यासमवेत एक बैठक घ्या. शिक्षण मंडळातील ठेकेदारी मोडित काढून महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवणे गरजेचे आहे. शहर परिसरात महिला सुरक्षा याबाबत पोलीस आयुक्त यांच्यासमवेत बैठक घ्यावी, असे मत सर्व नगरसेवकांनी व्यक्त केली.
महापौर उषा ढोरे यांनी शहर परिसरात महिला सुरक्षा याबाबत पोलीस आयुक्त यांच्यासमवेत बैठक घ्यावी. शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना आयुक्तांना केली.


















